Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पत्‍नीच्‍या मृत्‍यूने होता तणावात; विरहात पुलावरून मारली उडी

पत्‍नीच्‍या मृत्‍यूने होता तणावात; विरहात पुलावरून मारली उडी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : फुलपाट टाकळी (ता. धरणगाव) येथील ३० वर्षीय तरुणाने बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या (GIrna River) पुलावरून गुरुवारी (ता. ६) सायंकाळी उडी घेऊन आत्महत्या केली. फुलपाट ग्रामस्थांनी मृतदेहाची ओळख (Jalgaon News) पटविली असून, श्याम प्रताप भिल (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

श्याम भिल हा त्याचा भाऊ भुरा भिल याच्यासोबत राहत होता. तो वाळूच्या ठेक्यावर काही महिन्यांपूर्वी काम करीत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर श्याम भिल तणावात होता. त्यामुळे गुरुवारी बांभोरीजवळील पुलावरून त्याने थेट गिरणा नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून उडी घेण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शी दोघांनी त्याला हटकले होते. मात्र, आत्महत्येचा निर्धार पक्का असल्याने त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुलावरून थेट उडी घेतली. हा प्रकार वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बांभोरी येथील ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेंगडे, चेतन पाटील, होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. नदीपात्रातच वाळू ठेक्यांवर काम करीत असल्याने श्याम भिल यांची ओळख वाळू व्यवसायिक, वाहतुकदारांनी पटविली व पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामस्थांना बोलावून त्याची खात्री करून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT