Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: यावल तालुका परिसरात वादळी वारा; पत्री शेड पडल्‍याने घोड्याचा मृत्‍यू

यावल तालुका परिसरात वादळी वारा; पत्री शेड पडल्‍याने घोड्याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

हिंगोणा (जळगाव) : यावल तालुक्यातील परसाडे परिसरात व संपुर्ण तालुक्यात (Yawal) रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वारा झाला. या वाऱ्यात घोडा बांधलेले एक घर कोसळल्याने त्यात घोड्याचा मृत्यु झाल्याची (Jalgaon News) घटना घडली आहे. (Live Marathi News)

यावल तालुक्‍यातील परसाडे गाव परिसरात २९ मेच्या रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आले. यामुळे परसाडे तालुका यावल येथील पीरखा लालखा तडवी यांच्या घोडा बांधलेल्या घराचे पत्र्यांसह छत कोसळून घोडा लाकडा खाली व पत्राखाली दाबला जाऊन गुदमरून मरण पावला आहे. गरीब कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्‍या घोड्याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नासाठी मागणी असायची. वादळी वाऱ्यात मृत्‍यू झाल्‍याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा परसाडे येथील तलाठी समीर तडवी व ग्रामसेवक मजीत तडवी यांनी केला.

केळीचे पिकही पडले

यावल तालुक्‍यात झालेल्‍या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील केळीचे पिक देखील मोडून पडले आहे. काही शेतांमधील केळीचा पाडा पडणार होता. काही नवती बाग असल्‍याने केळीचे खोड वाकून पडले आहे. यामुळे शेतकरीचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पुण्यात फिरण्यासाठी आला, मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला; तानाजी कड्यावरून दरीत पडून तरुण बेपत्ता

Maharashtra Live News Update : पुणे रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला पोलिसांनी दिल्लीतून घेतलं ताब्यात

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर अगोदर शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत

Ganesh Utsav 2025 : लाडक्या गणूला नेमके २१ मोदकच का अर्पण केले जातात?

First iPhone: जगातील पहिल्या iPhoneची किंमत किती होती आणि कधी लाँच झाला?

SCROLL FOR NEXT