St Strike saam tv
महाराष्ट्र

St Strike: ग्रामीण भागात ‘लालपरी’ अजूनही दिसेना!

ग्रामीण भागात ‘लालपरी’ अजूनही दिसेना!

Rajesh Sonwane

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी अजूनही संपावर आहेत. यामुळे बससेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. परंतु, काही कर्मचारी कामावर रुजू झाल्‍याने काही प्रमुख मार्गावर बसफेरी सुरू झाली आहे. यातून काहीसे उत्‍पन्‍न मिळत असले, तरी ग्रामीण भागात (MSRTC Bus) ‘लालपरी’ची प्रतीक्षा कायम आहे. (msrtc bus still not seen in rural areas)

एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण व्‍हावे; या मागणीसाठी कर्मचारी तब्बल साडेतीन महिन्‍यांपासून संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप आहे. या संपामुळे (St Strike) शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात बससेवा सुरू करण्यात महामंडळाला यश आले आहे. महामंडळातर्फे जळगाव जिल्‍ह्यातील तालुक्‍याची शहरांसह (Nashik) नाशिक, औरंगाबाद, धुळे (Dhule) या मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. सध्‍या शहरी मार्गावर सुरू असलेल्‍या सेवेने प्रवाशांची सोय होत असून याला प्रतिसाद देखील मिळत आहे.

ग्रामीण भागात प्रतीक्षाच

महामंडळातील काही कर्मचारीच कामावर रुजू झाल्‍याने शहरी भागातील बससेवा सुरू करता आली आहे. दुसरीकडे मात्र पाय ठेवायलाही जागा मिळत नसलेल्‍या ग्रामीण भागातील बसची अजूनही प्रतीक्षा आहे. कर्मचारी रुजू झाल्‍यानंतरच ग्रामीण भागात लालपरी पुन्‍हा नव्‍याने धावू शकेल.

८० कोटीचा फटका

कोरोनाचा (Corona) प्रसार झाल्‍यानंतर लागू झालेला लॉकडाऊनमध्‍ये देखील बससेवा तीन महिने बंद होती. यानंतर पूर्वपदावर येवू लागलेल्‍या महामंडळाच्‍या सेवेत कर्मचारी संपाचा ब्रेक लागला. या संपामुळे मागील साडेतीन महिन्‍यांपासून महामंडळाच्‍या जळगाव विभागाला ८० कोटीच्‍या जवळपास उत्‍पन्‍नाचा फटका बसला आहे. शहरी भागात सुरू असलेल्‍या काही फेऱ्यांमुळे काहीतरी उत्‍पन्‍न मिळत आहे. तरीदेखील गत साडेतीन महिन्‍यात ८० कोटीचा फटका जळगाव विभागाला सहन करावा लागत आहे.

जिल्‍ह्यात १६७ फेऱ्या

महामंडळाच्‍या जळगाव विभागात रुजू झालेल्‍या कर्मचारींच्‍या बळावर प्रमुख मार्गांवर बस फेऱ्या सुरू झाल्‍या आहेत. जिल्‍ह्यात सद्य:स्थितीला १६७ फेऱ्या सुरू आहेत. यात अमळनेर आगारातून सर्वाधिक ३४ फेऱ्या असून या खालोखाल पाचोरा २७, जळगाव २३, जामनेव व रावेर १७, चोपडा १६, चाळीसगाव १५ फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांमधून विभागाला ३१ लाख १० हजार रूपयांचे उत्‍पन्‍न मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT