Soldier Death Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सेवेचा कार्यकाळ वाढविला; बदलीच्‍या ठिकाणी जाताना जवानाला वीर मरण

सेवेचा कार्यकाळ वाढविला; बदलीच्‍या ठिकाणी जाताना जवानाला वीर मरण

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या आर्मीच्या वाहनाचे मागील फाटक अचानक तुटले. या (Accident) अपघातात लोण (ता. अमळनेर) येथील सैनिकाला (Soldier Death) वीर मरण आले. हा अपघात मंगळवारी (१६ मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. (Latest Marathi News)

लोण (ता. अमळनेर) येथील लिलाधर नाना पाटील (वय ४२) हे आसाममधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. (Aasam) आसामहून ४०० किलोमीटरवर असलेल्या अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाली होती. आर्मीच्या ट्रकमध्ये २० जणांची तुकडी नेली जात होती. लिलाधर हे मागे बसले होते.

खाली पडल्‍याने डोक्‍याला मार

पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचे मागील फाटक तुटल्याने लिलाधर पाटील हे खाली पडले. यात त्‍यांना दगडाचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचे शव गुरुवारी (ता. १८) सकाळी लोण येथे आणण्यात येणार असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडिल, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT