महाराष्ट्र

चिमुकल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यु

चिमुकल्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यु

Rajesh Sonwane

वाकोद (जळगाव) : आजीसोबत शेतात गेलेल्‍या चिमुकल्‍या बहिण भावाचा दुर्देवी अंत झाला. शेताच्‍या जवळच असलेल्‍या केटीवेअर बंधाऱ्यांजवळ गेले. पाणी पाहून त्‍यांना उतरावेसे वाटले व यातच त्‍यांचा बुडून मृत्‍यू झाला. (jalgaon-news-sister-and-brother-drowned-dam-water-and-death)

जांभोळ (ता. जामनेर) येथील गोरख एकनाथ वायखर यांचा सहा वर्षीय मुलगा व नितिन एकनाथ वायखर यांची सात वर्षीय मुलगी यांचा शेताला लागून असलेल्या कट्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चिमुकल्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाचा श्‍वास सुरू होता पण

जांभोळ (ता. जामनेर) येथे ही दोन मुले आपल्या आजीसोबत शेतात गेली होती. आजी कामात व्यस्त असतांना या दोघा भावंडांनी शेताला लागून असलेल्या केटीवेअरमध्ये असलेले पाणी पाहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तिकडे धाव घेत या लहान बालकांना पाण्यातून काढण्यात आले. अगोदर मुलाला बाहेर काढण्यात यश आले; त्यावेळी मुलाचा श्वास सुरु होता. त्यानंतर मुलीचा मृतदेहच बाहेर काढला. मुलाला दवाखान्यात नेत असतांना वाकोदपर्यंत आल्यावर निधन झाले. या घटनेने गावासह परिसरात हळ्हळ व्यक्त केली जात आहे.

आई– वडीलांचा हंबरडा

खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्दैवी चिमुकल्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT