श्रीराम मंदिर 
महाराष्ट्र

दिव्यांगांच्या हातांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर; १ हजार १५१ दीप प्रज्वलित

दिव्यांगांच्या हातांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर; १ हजार १५१ दीप प्रज्वलित

संजय महाजन

जळगाव : सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतांना दिव्यांग, गतिमंद मुलांनी देखील सामाजिक भावना जपत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला आहे. रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दीप प्रज्वलित करण्यात आले. (jalgaon-news-Shriram-temple-lit-by-the-hands-of-the-cripples-one-thousand-151-lamps-lit)

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी चिमुकले श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दिव्यांग बालकांनी ११५१ तेलाचे दिवे प्रज्वलित केले. त्यानंतर महाआरती होऊन कोरोनाचे संकट टळून पुन्हा सुखमय दिवस येऊ दे, असे प्रभू श्रीरामचंद्रांना साकडे घालण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, ह.भ.प.दादा महाराज जोशी, भाजप गटनेते भगत बालाणी, डॉ.स्नेहल फेगडे, सुप्रीम कंपनीचे अनिल काबरा, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, डॉ.आदित्य माहेश्वरी, धनराज कासट, मनिषा पाटील, विनोद शिरसाळे, आदींसह उडानचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.

वस्‍तूंनाही मॉलमध्‍ये जागा

उडानच्या दिव्यांग मुलांनी दिवाळीसाठी अनेक आकर्षक वस्तू साकारल्या. काही वस्तूंना नामांकित मॉल, सुपर शॉपमध्ये विक्रीसाठी स्थान मिळाले. आजच्या दिवसाचे औचित्य साधत अगरबत्तीचा ३६ वा सुगंधित फ्लेवर बाजारात आणण्यात आला. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खऱ्या अर्थाने दिवाळी पावली - महापौर

दिव्यांग विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक वस्तू साकारल्या आहेत. आज दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम साजरा करताना विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त कौतुकास्पद होती. आजची दिवाळी खरोखरच आगळीवेगळी होती. प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना करून दिवाळी पावली, अशी बोलकी प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

श्रीराम मंदिराची केली साफसफाई

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी चिमुकले श्रीराम मंदिर परिसराची साफसफाई केली. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करीत मंदिर परिसराची शोभा वाढवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT