Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

किरीट सोमय्या विरोधात शिवसेना आक्रमक; जळगावात घातले बांगड्यांचे हार

किरीट सोमय्या विरोधात शिवसेना आक्रमक; जळगावात घातले बांगड्यांचे हार, बुलढाण्या जोडे मारो आंदोलन

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

जळगाव/बुलढाणा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने निदर्शने करत भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तर जळगावात बांगड्यांचे हार घातला. (jalgaon news Shiv Sena aggressive against Kirit Somaiya Bangle necklace worn in Jalgaon)

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. हा निधी राजभवनामध्ये जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत हा निधी राजभवनाला प्राप्त झाला नसल्‍याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना (Shiv Sena) प्रमुख जालींदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच

किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही; तोपर्यंत शिवसेना आंदोलनात्मक भूमिका सुरू ठेवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

जळगावात बांगड्यांचा हार घालून जोडो मारो

किरीट सोमय्या यांच्‍या विरोधात जळगाव (Jalgaon) शिवसेने देखील आंदोलन छेडले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमय्या यांच्या बॅनरला शिवसेना महिलांनी जोडे मारून बांगड्यांचा हार घालून अनोखे आंदोलन केले. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

'पाकिस्तानने ७ भारतीय लढाऊ विमाने पाडली, त्यांना भंगार..' पंतप्रधानांचा मोठा दावा, ट्रम्पचंही कौतुक

DRDO Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार डीआरडीओमध्ये नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT