वाकोद (जळगाव) : नवजात बाळांना बोल फुटायला कमीत कमी एक वर्षाचा अवधी लागतो. परंतु, फक्त सात दिवसांचे बाळ बोलू लागले..असे कल्पनेत देखील येवू शकत नाही. मात्र गेल्या आठवडाभरापासून असेच बोलले जात आहे. विशेष म्हणजे याचा व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यानंतर अंनिसने प्रत्यक्ष जावून त्याची सत्यता तपासली आहे. (jalgaon-news-seven-day-old-baby-is-talking-video-social-media-viral)
जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या आठवड्या भरापासून चर्चेचा विषय बनलेली घटना सर्व नागरिकांना कुतूहल वाटत आहे. ते म्हणजे सात दिवसांचे बाळ बोलत आहे. सात दिवसाचे बाळ स्पष्ट बोलतेय हे पाहण्यासाठी नागरिक देखील गर्दी करत आहेत. ही अशक्यप्राय गोष्ट पाहण्यासाठी नागरिक उत्सुकतेने पळासखेडचा रस्ता धरत होते.
म्हणे बाळ मागतेय चहा, बिस्कीट
पहुर (ता. जामनेर) येथील सासरवासीन असलेली महिला बाळतपणासाठी पळासखेड़े (ता. सोयगाव) येथे आईकडे आली होती. फक्त सात दिवासांचे बाळ आई मला चहा दे, आई मला बिस्किट दे अस स्पष्ट बोलत असल्याचा दावा त्यांच्याच घरातील मंडळींनी केला होता. त्यानंतर ही बातमी समाजमाध्यमाद्वारे सर्वदुर व्हायरल झाली होती. या बातमीने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी बाळ पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत होते.
अंनिस पोहचले त्या घरी
बाळ बोलत असल्याची सत्यता तपासण्यासाठी वाकोद येथील अंनिसचे कार्यकर्ते वसंत जोशी यांनी स्वतः पलसखेडे येथे जाऊन प्रत्यक्ष पाहुन माहिती घेतली. परंतु, असा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे समोर आले असून हा दावा निव्वळ खोटा आहे. लहान बाळ बोलण्याचा दावा महाराष्ट्र अंनिसने फेटाळला असून यात कुठलीही सत्यता नसल्याचे अंनिसचे कार्यकर्ते वसंत जोशी यांनी सांगितले. तसेच अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका असे अंनिसने कळवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.