Amalner Mangalgrah Temple News, Jalgaon Latest Marathi News Saam tv
महाराष्ट्र

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर अमळनेरमध्‍ये; उष्ण लाटेच्‍या बचावासाठी खास सोय

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर अमळनेरमध्‍ये; उष्ण लाटेच्‍या बचावासाठी खास सोय

संजय महाजन

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगलग्रह मंदिर देवस्थान हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर म्हणून ओळखले जात असल्याने या ठिकाणी संपूर्ण देश भरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्या जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका भाविकांना बसत असल्याचे लक्षात आल्यावर मंदिर संस्थांच्यावतीने मंदिर परिसरात ठिकाणी पाण्याचे फवारे उभारण्यात आले असून या फावाऱ्यांमुळे परिसरातील तापमानात (Temperature) पाच ते दहा अंश तापमान हे कमी राहत असल्याने याचा फायदा जसा भाविकांना होत आहे. (jalgaon news second largest temple in India at Amalner)

मंगळग्रह देवतेची भारतात केवळ दोन मंदिर आहेत. त्यातील अमळनेर (Amalner) येथील मंदिर मानले जाते. अतिशय पुरातन काळापासून असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून आता चांगलेच नावारूपाला आले आहे. ज्याच्या पत्रिकेत मंगळ आहे; त्यांच्यासाठी या मंदिरात दर्शन घेतल्याने त्यांच्या आयुष्यात मंगलमय होते. त्याचबरोबर विवाह (Marriage) योग्य तरुण– तरुणींनी दर्शन घेतल्यावर त्यांचे लवकरच विवाह जुळून येत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करीत असतात. (Jalgaon Latest Marathi News)

तापमानाची तिव्रता केली कमी

अमळनेर परिसर नेहमीच दुष्काळग्रस्त असल्याने या भागात पशू पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी जगणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर मंदिर संस्थानच्‍यावतीने जाणीवपूरक पशू पक्षी यांच्या निर्वाहासह त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोई करून देण्यात आल्या आहेत. त्यात वाढत्या तापमानात त्यांना दिलासा मिळावा; यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात तुषार सिंचन लावण्यात आल्याने या परिसरातील तापमानात मोठी घट झाल्याने वाढत्या उष्णतेच्या लाटेत भाविकांना फायदा होत आहे.

पक्षांसाठीही बनले निवारा केंद्र

या वातावरणाचा पक्षांना ही मोठा दिलासा मिळाला असल्याने हजारोंच्या संखेने देशी विदेशी पक्षांनी या मंदिर परिसरात आपला निवारा तयार केला आहे. दिवस रात्र पक्षांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजून गेला आहे. पक्षाचे पर्यावरणातील महत्‍त्व लक्षात घेता त्यांची संख्या वाढविण्यासाठी मंदिर संस्थानला ज्या काही उपाय योजना कराव्या लागतील त्या आम्ही करणार असल्याच संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT