Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

वाळू चोरी रोखण्यासाठी ‘आरपीएफ’चे पथक

वाळू चोरी रोखण्यासाठी ‘आरपीएफ’चे पथक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : येथून जवळच असलेल्या बांभोरी, निमखेडी रेल्वे पुलाखालून गिरणानदी जाते. रेल्वेच्या पुलाखाली वाळू माफियांनी वाळू पोखरल्याने या पुलाला धोका निर्माण होवू शकतो. यामुळे रेल्वेने पुलाच्या सुरक्षेसाठी (Railway) रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)चे पथक चोवीस तास या पुलाखाली तैनात ठेवावे, पुलाकडे मोठी वाहने येणार नाहीत, यासाठी बॅरिकेटस ठेवावेत आदी निर्णय शनिवारी (ता. २५) महसूल, रेल्वे विभाग, आरपीएफ, पोलिस, आरटीओ (RTO) विभागाने घेतला आहे. (jalgaon news RPF squad to prevent sand theft in girna river)

पिलरची केली पाहणी

पाचही विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट गिरणा नदीपात्रात (Girna River) जाऊन निमखेडी, बांभोरी रेल्वे पुलाची पाहणी केली. वाळू माफियांनी पुलाच्या पिलरजवळील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याचे दिसून आले. पिलरजवळ जर अधिक उपसा झाला तर पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. यामुळे रेल्वेने (Jalgaon News) याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. महसूल, पोलिस यंत्रणा वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी उपाय योजना करीत असते. मात्र पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने रेल्वेने पुलाची सुरक्षा स्वतः करावी असे सूचविण्यात आले. त्यावर आरपीएफचे एक पथक या दोन्ही पुलाखाली चोवीस तास तैनात ठेवण्याचे ठरविण्यात आले.

सीसीटीव्हीची मागणी

सोबतच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. पुलाजवळील परिसरात मोठी वाहने येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याचे सूचविण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, सहाय्यक पोलिस अधीक्षक वाकचौरे, तहसिलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक कुंभार, सहाय्यक निरीक्षक बुवा, रेल्वेचे अभियंता महेंद्र पाटील, मेश्राम, आरपीएफचे अधिकारी, आरटीओ विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT