Muktainagar News Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील काही जागांवर चुरशीच्या लढती होण्याचे चित्र होते. यात मुक्ताईनगर मतदारसंघाचा देखील समावेश होता.

Rajesh Sonwane

जळगाव : विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभ्या होत्या. यात त्यांच्या विरोधात असलेले शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला आहे. रोहिणी खडसे यांचा हा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. 

विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील काही जागांवर चुरशीच्या लढती होण्याचे चित्र होते. यात मुक्ताईनगर मतदारसंघाचा देखील समावेश होता. याठिकाणचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे उभ्या होत्या. अर्थात मुक्ताईनगर मतदारसंघात चुरशीची लढाई होणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते. कारण २०१९ च्या निवडणुकीत देखील दोन्ही उमेदवार आमने- सामने होते. त्यावेळी देखील रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीत चित्र बदलणार असे बोलले जात होते. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास दाखविला आहे. 

खडसेंना मोठा धक्का 

मुक्ताईनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या उमेदवारी करीत होत्या. त्यांचा पराभव झाला आहे. यामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT