Maharashtra Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Rohini Khadse: शरद पवारांसमोर नाराजीनाट्य! भाषण उरकायला सांगितल्याने रोहिणी खडसे संतापल्या; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics Breaking News: कार्यक्रमात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांना भाषण उरकरण्याची सुचना केल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जामनेर|ता. २२ एप्रिल २०२४

जळगावच्या जामनेरमध्ये काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांना भाषण उरकरण्याची सुचना केल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

शरद पवारांसमोर नाराजीनाट्य!

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जामनेरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना रोहिणी खडसे यांना भाषण उरकण्याची सूचना मिळाल्याने रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

"शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे. एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथे महिलांना समसमान अधिकार आहेत," असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

आमच्या रक्तात गद्दारी नाही..

दरम्यान, यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशावरही महत्वाचे विधान केले. नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीत भाजपमध्ये जात आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. आमच्या रक्तात गद्दारी नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT