Amravati News: धक्कादायक! वर्षभरात अमरावती जिल्हा रुग्णालयात ३७३ बालकांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Amravati Breaking News: शासकीय रुग्णालयांमध्ये २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील३७३ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Amravati Breaking News
Amravati Breaking NewsSaamtv

अमर घटारे, अमरावती| ता. २२ एप्रिल २०२४

अमरावती जिल्ह्यातील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील३७३ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावतीमधील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील ३७३ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक २२४ मृत्यू हे जिल्हा स्त्री रुग्णालय ( डफरीन)येथील असून, उर्वरित १४९ बालकांचे मृत्यू हे जिल्ह्यतील इतर शासकीय रुग्णालयात झालेले आहे.

तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४९ बालमृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये ४७बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मेळघाटातील आदिवासी भागामध्ये कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबवण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहे.

Amravati Breaking News
Buldhana News: उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल

त्याचबरोबर सामाजिक संस्थांनाही कुपोषण बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यावधीचा निधी पुरवला जात आहे. तरी जिल्ह्यातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही.त्यामुळेया तान्हुल्यांच्या मृत्यूला जबाबदारकोण,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Amravati Breaking News
Milind Narvekar: मिलिंद नार्वेकरांना महायुतीची मोठी ऑफर? 'मातोश्री'चा दूत शिंदेचा उमेदवार होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com