Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सासरवाडीहून लग्नावरून परतला अन्‌ घेतले विष; माहेरीच होती पत्‍नी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खेडीकढोली (ता. एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विषारी द्रावण प्राशन करून आत्महत्या (Jalgaon News) केल्याची घटना गुरूवारी (४ मे) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अंत्यवस्थ तरुणाला जळगावी हलवण्यात आले. मात्र, त्याचे प्राण वाचु शकले नाही. ज्ञानेश्वर रमेश कोळी (वय ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर कोळी हा पत्नी व दोन मुलांसह (Erandol) एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे वास्तव्याला होता. शेतमजूरीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाहर करीत होता. ज्ञानेश्वर कोळी यांच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्याने पत्नी अनिता आणि दोन्ही मुलांसह (Amalner) अमळनेर येथे लग्नासाठी बुधवार (ता. ३) सकाळी ९ वाजता गेले होते. ज्ञानेश्वर हा दुपारी अमळनेर येथून खेडी कढोली येथे आला. त्यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले ही अमळनेरला थांबलेली होती.

आत्महत्येचे कारण अस्‍पष्‍ट

रात्री ९ वाजता घरी आल्याचे ग्रामस्थांनी त्याला पाहिले होते. मध्यरात्री ज्ञानेश्वर कोळी याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी ७ वाजता लक्षात आला. शेजारी आणि ग्रामस्थांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT