Shirdi News: शिर्डी नगरपरिषद विजेच्या बाबतीत झाली स्वयंपूर्ण; वर्षाकाठी वाचणार ८० टक्‍के रक्‍कम

शिर्डी नगरपरिषद विजेच्या बाबतीत झाली स्वयंपूर्ण; वर्षाकाठी वाचणार ८० टक्‍के रक्‍कम
Shirdi News Solar Energy
Shirdi News Solar EnergySaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी : शिर्डी नगरपरिषद सौरऊर्जेमुळे विजेच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण झाली आहे. शिर्डी (Shirdi) नगरपरीषदेला मिळालेल्या विविध पुरस्काराच्या रकमेतून हजारो (Solar Energy) सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत. यातून मिळणा-या विजेतून नगरपरीषदेला येणारे लाखो रूपयांचे बिल आता ८० टक्‍के कमी होणार आहे. (Live Marathi News)

Shirdi News Solar Energy
Pune Crime News: सहकार मंत्र्यांचा सचिव असल्‍याचे सांगत ५९ लाख रूपयांचा गंडा

महावितरणकडून वीज पुरवठा असल्‍याने शिर्डी नगरपरिषदेला महिन्याला साधारण १५ लाख रुपये तर वर्षाकाठी पावणे दोन कोटी रुपये विजबिल येते. यामुळे मोठी रक्‍कम वीज बिलात जात असते. यावर पर्याय म्‍हणून महापालिकेने सौर प्रकल्‍प उभारणी केली आहे. यामुळे आता यातील ८० टक्के रक्कमेची बचत होणार असल्याने इतर विकासकामांसाठी ही रक्कम वापरता येणार आहे.

Shirdi News Solar Energy
Kalyan News: महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र लांबविले; चोरटा अवघ्या चार तासात गजाआड

दोन वर्ष तांत्रिक अडचण

शिर्डीतील पाणीपुरवठा तलाव, नगरपरीषद इमारतीसह विविध ठिकाणी बसविण्यात आले सौरऊर्जा प्रकल्प दोन वर्षांच्या तांत्रीक अडचणीनंतर आता सुरू झाले आहेत. याचा आढावा घेतलाय आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सदर माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com