भाजीपाल्‍याचे  
महाराष्ट्र

भाजीपाल्‍याचे दर पाहुन व्‍हाल अवाक..पावसाचा परिणाम

भाजीपाल्‍याचे दर पाहुन व्‍हाल अवाक..पावसाचा परिणाम

संजय महाजन

जळगाव : सलग पाऊस झाल्‍याने त्‍यातच अतिवृष्‍टीमुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्‍याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला पोहचले असून सर्वसाधारण गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. (jalgaon-news-result-of-rains-the-prices-of-vegetables-increased)

सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम सर्वत्र जाणवायला लागला. याचाच परिमाण जिल्ह्यात सध्या बाजारावर झालेला दिसून येत आहे. पावसामुळे पालेभाज्‍या सडल्‍या आहेत. यामुळे सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली असून भाज्यांचे दर वाढले आहे. सद्यस्थितीत बाजारात मेथी, पालक, कोबी, पोकळा, कोथिंबीर यासह इतर भाज्यांचे दर प्रत्येकी पाच ते दहा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.

भाजीबाजार मंदावला

वाढत्या पावसामुळे पालेभाज्या ताज्या व टवटवीत मिळत नाहीत. मात्र तरीही त्या खरेदी कराव्या लागत असल्‍याचे महिलांनी सांगितलेय. सध्या जिल्‍ह्यातील अनेक भागात ओला दुष्काळी परिस्थिती असल्‍याचा परिणाम भाजीपाल्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक देखील कमी झाली असून भाज्यांचे दर वाढले आहेत. परिणामी भाजीबाजार मंदावला आहे.

असे आहेत दर

भाजी....दर (प्रतिकिलो)

फ्लॉवर...६०

पत्‍ताकोबी..४०

टमाटे......५०

वांगे........५०

वटाणे.....१२०

मेथी.......६०

चवळी शेंगा...८०

कांदा पात.....६०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT