जळगाव : भारताच्या गाणकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. यामुळे संगीतक्षेत्रातच नव्हे तर देशात शोककळा पसरली. लतादीदींना विविध स्तरातून आदरांजली वाहिली जात आहे. त्यानुसार जळगावातील (Jalgaon) ओजस्विनी कला महाविद्यालयाने ५०० किलो रांगोळीतून लतादीदींची भव्य अशी प्रतिकृती साकारून आदरांजली अपर्ण करण्यात आली. (jalgaon news Latadidi made from 500 kg rangoli)
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. त्याच्या जाण्याने संगीतक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमातूनच लतादीदींना अनेकांकडून आदरांजली वाहिली जात आहे. परंतु, जळगावातील ओजस्वीनी कला महाविद्यालयातर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
४० बाय ४० आकाराची भव्य रांगोळी
पाचशे किलो रांगोळीचा वापर करून ४० बाय ४० या आकारात साकारलेल्या भव्य रांगोळीच्या प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज (India Flag) देखील साकारण्यात आला आहे.
रांगोळीला लागले २४ तास
भव्य रांगोळी काढण्यासाठी ५ शिक्षक आणि विद्यार्थी यांनी २४ तासाचा अवधी लागला. रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे. रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन, कुणाल जाधव, रिटा घुगे, सागर चौधरी, ईशा भावसार, ज्योती सहानी,श्रध्दा सहानी यांनी सहकार्य केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.