Suicide
Suicidesaam tv

धक्‍कादायक.. ‘सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय..' व्हिडिओ तयार करत जवानाची आत्महत्या

‘सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय..' व्हिडिओ तयार करत जवानाची आत्महत्या
Published on

धुळे : भारतीय सुरक्षा दलातील जवानाने टोकाचे पाऊल उचचले. आत्‍महत्‍या करण्याचे कारण सांगत 'सॉरी आबा, तुम्हाला न सांगताच जातोय..' असा व्‍हीडीओ तयार करत जवानाने आत्महत्या केली. (dhule news Suicide of a soldier while making a video)

Suicide
Hijab: अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा नको, महाराष्‍ट्रात खपवून घेतले जाणार नाही; रूपाली चाकणकर

धुळे (Dhule) तालुक्यातील लामकानी येथील गोरख नानाभाऊ शेलार ऊर्फ गौतम (वय २५) या भारतीय सेनेतील जवानाने (Soldier) आत्‍महत्‍या केली. गोरख शेलार भारतीय सेनेत पुणे (Pune) येथील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजात शिपाई पदावर कार्यरत होते. गोरख शेलार हे चार वर्षांपूर्वीच २०१७ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. गावात नम्र आणि शांत स्वभावी म्हणून त्यांची ओळख होती.

व्‍हीडीओ केला व्‍हायरल

सासरच्या नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी या जवानाने आत्महत्या करण्याचे कारण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 'सॉरी आबा, तुम्हाला न सांगताच जातोय..' असे म्हणत त्यांना होत असलेल्या त्रासाची सर्व कैफियत व्हिडिओ बनवून आत्महत्या केली आहे.

मानसिक छळ करणाऱ्यांची व्‍हीडीओत नावे

कौटुंबिक वादाला आणि वारंवार होणाऱ्या बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ज्या आप्तस्वकीयांनी मानसिक छळ केला त्यांचा नामोल्लेख केला आहे. गोरख यांचे वडील नानाभाऊ तानका शेलार शेतकरी होते. त्यांनी देखील कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या (Farmer) केली होती. मोठा भाऊ केशवने मोठ्या मेहनतीने गोरखला शिकवीत भारतीय सैन्यात भरती केले होते. गोरख सैन्यात भरती झाल्याने कुठे चांगले दिवस परिवारास आले होते. अशात गोरख यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com