Hijab: अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा नको, महाराष्‍ट्रात खपवून घेतले जाणार नाही; रूपाली चाकणकर

अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यावर गदा नको, महाराष्‍ट्रात खपवून घेतले जाणार नाही; रूपाली चाकणकर
Rupali Chakankar
Rupali Chakankarsaam tv
Published On

धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार सर्वांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. अशा निर्णयावर जर कोणी गदा आणत असेल, तर ती निंदनीय बाब आहे. महाराष्ट्रमध्ये (Maharashtra) ती खपवून घेतली जाणार नसल्‍याचे सांगत या घटनेचा रूपाली चाकणकर यांनी निषेध व्यक्त केला. (dhule news rupali chakankar hijab Freedom of expression will not be tolerated in Maharashtra)

Rupali Chakankar
रूपाली चाकणकरांच्‍या पत्रपरिषदेतच वाईन विक्रीचा महिलांनी केला निषेध

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या आज धुळे दौऱ्यावर आहेत. कर्नाटक (Karnataka) येथील मुस्लीम समाजातील विद्यार्थीनी व महिलांना हिजाबमध्ये (Hijab) शिक्षण घेण्यास मज्जाव आणून महाविद्यालयात प्रवेश बंदी केली. हिजाब परिधान करण्यावरून सुरू असलेल्या वादावर चाकणकर यांनी निषेध व्‍यक्‍त केला.

त्‍या आरोपीला फाशीच्‍या शिक्षेची मागणी

पिंपरी– चिंचवड येथे अकरा वर्षीय नाबालिक मुलीवर वडिलांच्या मित्राने वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केले. या घटनेसंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यामध्ये दखल घेत आरोपींवर मरेपर्यंत फाशीची शिक्षाची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com