Mahavitaran News Saam tv
महाराष्ट्र

MSEDCL: वीज खंडित थकबाकीदारांकडेही लागेल लाईट; महावितरणचा दिलासा

वीज खंडित थकबाकीदारांकडेही लागेल लाईट; महावितरणचा दिलासा

Rajesh Sonwane

जळगाव : वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या (Jalgaon) पुनरुज्जीवनासाठी विलासराव देशमुख अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळाली आहे. (Breaking Marathi News)

विलासराव देशमुख अभय योजनेचा (MSEDCL) लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या (Mahavitaran) वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक ग्राहकांना पहिला हप्ता मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या सात दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.

डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगरकृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी अर्थात १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत होता. मात्र, अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

..तर तो ग्राहक योजनेतून अपात्र

ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ ला किंवा त्यापूर्वी मंजूर केले आहेत त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

SCROLL FOR NEXT