JDCC Bank
JDCC Bank 
महाराष्ट्र

अर्ज रद्द केलेल्या भाजपच्‍या चार उमेदवारांचा बँकेतच ठिय्या; जिल्‍हा बँक निवडणूकीचे राजकारण

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक (JDCC Bank Election) प्रक्रियेत मुद्दाम डावलण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपच्‍या (BJP) उमेदवारांनी बँकेतच ठिय्या आंदोलन केले. यात माजी आमदाय स्मिता वाघ यांचा देखील समावेश आहे. (jalgaon-news-Politics-of-jdcc-Bank-Elections-Four-BJP-candidates-whose-applications-were-rejected-remain-in-the-bank)

जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळाच्‍या निवडणूकीत अर्ज पडताळणी व त्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी बुधवारी झाल्‍या. या दरम्‍यान काही अर्जांवर हरकती आल्या असून त्‍यावर निवडणूक निर्णय अधिकारी आज निर्णय घेणार आहेत. यापुर्वीच जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा अर्ज रद्द ठरल्‍याने त्‍यांचे पती चंद्रशेखर अत्‍तरदे यांनी बँकेत राडा केला. तसेच माधुरी अत्‍तरदे यांनी निवडणूक अधिकारी यांनी अर्ज वैध करण्यासाठी पन्नास हजार मागितल्याचा आरोप केल्‍याचे बोलताना सांगितले.

भाजपच्‍या उमेदवारांचा आरोप

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीचे रणांगण आतपासून तापू लागले आहे. भाजच्‍या उमेदवारांचे अर्ज रद्द झाल्‍याने त्‍यांनी बँकेत ठिय्या आंदोलनास सुरवात केली. यात सर्वात प्रथम जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर खळबळ उडाली आहे. तर माजी आमदार स्मिता वाघ यांनीही अर्ज रद्द झाल्‍यानंतर गैरव्यवहाराचा आरोप करत ठिय्या आंदोलनाला बसल्‍या. याशिवाय मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातील नाना पाटील यांनी आपण कर्ज घेतले नसतांनाही कर्जदार दाखविण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनात सहभाग घेतला. याशिवाय, खासदार रक्षा खडसे देखील यात सहभागी होणार असल्‍याचे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT