Ashish shelar 
महाराष्ट्र

शेलारांचा खडसेंना टोला; जो भाजप सोडतो त्‍यांची दुर्गतीच

शेलारांचा खडसेंना टोला; जो भाजप सोडतो त्‍याची दुर्गतीच

संजय महाजन

जळगाव : एकनाथराव खडसे यांचा विषय जुना झाला आहे. त्‍यांच्‍यावर बोलत नाही; मात्र ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गतीच झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये दुध का दुध पानी का पानी होणार असल्याचे सांगत आमदार आशिष शेलार यांनी खडसे यांना अप्रत्‍यक्ष टोला लगावला आहे. (jalgaon-news-political-news-ashish-shelar-statment-eknath-khadse-entry-ncp)

जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असतांना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष पोपट भोळे आदींची उपस्थिती होती.

स्‍थानिक नेतृत्‍व बदलणार नाही

आमदार गिरीश महाजन यांना डावलले जात असल्‍यासंदर्भात मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले, की आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीत ते मदतीला धावून गेले असल्याकडे देखील शेलार यांनी लक्ष वेधले. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

परब एकाच परिवाराचे मंत्री

राज्‍याचे परिवहन मंत्री असलेले अनिल परब हे परिवार मंत्री आहे. ते एकाच परिवाराची सेवा करत असल्याची टीका शेलार यांनी केली. कर्मचाऱ्यांनी पुरात देखील काम केले. हे दुःख राज्‍य सरकार पाहतेय असे होत नाही. जुन्‍या बस चालविल्‍या जाताय, पगार वेळेवर होत नाही. असा महामंडळांचा भोंगळ कारभार सुरू आहे.

मृतांचे आकडे जाहीर करणारे ठाकरे सरकार

सरकारी यंत्रणेने सातत्याने आकडे लपवले आहेत. कोरोनाच्‍या काळात खुप आकडे लपविले गेले आहेत. कोकणातील पुरग्रस्‍तांच्‍या बाबतीत देखील असेच झाले आहे. म्‍हणून माणसांना वाचविणारे सरकार नसून मृतांचे आकडे जाहीर करणारे सरकार असल्‍याची टीका देखील शेलार यांनी केली.

सरकारचे खानदेशकडे दुर्लक्ष

सरकारचे खानदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आपण खानदेश दौरा करत असतांना माहिती मिळाली की, सुमारे दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. यामुळे केवळ घोषणा आणि फक्त सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

SCROLL FOR NEXT