Electric shock Saam tv
महाराष्ट्र

Electric shock: घरातील एकुलता एक दीपक विझला; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : घरात प्लग आणि वायरची जोडणी करत होता. हे काम करत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने तो खाली कोसळला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले होते. त्याला मोठे करून आता हा एकुलता मुलगा आपला आधार बनेल. अशी आईची आशा एका क्षणात विरली. घरात वायरची जोडणी करत असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून मुलाचा आईसमोरच मृत्यू झाला. या घटनेने विधवा आईचा आधार गेला आहे. (Tajya Batmya)

जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील शिवनगर भागात राहणारा दीपक सुरेश वारुळे (१६ वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. दीपक घरात प्लग आणि वायरची जोडणी करत होता. हे काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसल्याने तो खाली कोसळला व त्याची शुद्ध हरपली. यावेळी घरात असलेल्या आईने किंकाळी मारली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी त्यास उपचारासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे- पाटील, वैशाली पाटील यांनी त्याला तपासून वाचविण्यासाठी प्रयत्न केले. सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी जळगावला आणले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहीण आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आईचा आधार गेला 

दीपक दोन वर्षांचा असताना त्याचे पितृछत्र हरपले होते. आईने कष्ट करून त्यास शिकवले. आता दीपक कुटुंबाचे भाग्य उजळविणार, असे आईचे स्वप्न होते. मात्र यापूर्वीच दिपकचा मृत्यू झाला. दीपकच्या अकाली निधनाने आईचे हे स्वप्न भंगले. या घटनेने पहूर परिसरावर मोठी शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलासाठी बिबट्याला भिडली 'वाघीण'; बिबट्याच्या जबड्यातून लेकराला वाचवलं

Maharashtra Government: राज्य सरकारचा निर्णय मोठा, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

SCROLL FOR NEXT