Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

‘व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग' करणारी सहि‍ष्णा ठरली भारतातील सर्वात लहान

‘व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग' करणारी सहि‍ष्णा ठरली भारतातील सर्वात लहान

संजय महाजन

जळगाव : इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्समधील ‘व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग' हा कोर्स करणारी भारतात सर्वात कमी वयाची पाचोऱ्यातील (Pachora) सहिष्णा सोमवंशी ही पहिली कन्या ठरली जिने सर्वात कमी वयात हा कोर्स केला आहे. (jalgaon news pachora sahishna suryawanshi White Water River Rafting is the smallest in India)

भारताच्या डिरांग अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि आसामच्या (Aasam) सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी भारतातून (India) विविध राज्यांतील महिला आणि पुरुष अकरा दिवसाचा कॅम्प करण्यासाठी जातात. यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी भारतीय लोक सक्षम असावे; म्हणून हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने बनवला असुन यात माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्स केले जातात. येथे शुन्य तापमान असुन हा खडतर कोर्स पुर्ण करावा लागतो. प्रशिक्षण घेतांना येथे वास्तव्य करणेही आव्हानात्मक आहे. तब्बल सहा ते सात हजार किमीचा प्रवास येथे जाण्यासाठी करावा लागतो.

मुलांना पाठवण्याचे धाडस नाही

टेन्टमध्ये राहणे, सैन्याप्रमाणे जेवण घेणे, अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही. परदेशात अशा कोर्सला खुपच महत्व दिले जाते. त्यात जगात व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंगमध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षकांकडुन हे सर्व कोर्स शिकवले जातात.

सहिष्णाची हिंमत अन्‌ परिवाराची सोबत

भारतातून पाचोऱ्यातील सहिष्णा सचिन सोमवंशी ही सर्वात कमी वयाची अठरा वर्षाची मुलगी म्हणून हा कोर्स केल्याची पहिलीच ठरली आहे. तिने हा बहुमान खानदेशला दिला आहे. तिच्या यशात तिचे पालक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी व आई सुप्रिया सोमवंशी, आजोबा– आजी यांचा सहभाग आहे. सहीष्णा सोमवंशी ही ज्या टिममध्ये गेली त्यात अकरा महिला सदस्यांचा सहभाग होता.

सहीष्णाचे स्वागत

शहरात आगमन होताच सहीष्णाचे स्वागत दत्त कॉलनीत तिच्या निवासस्थानी रांगोळीसह फटाक्यांची आतषबाजी करुन करण्यात आले. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे या कोर्समुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. येणाऱ्या काळात ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना मी मार्गदर्शन करेल असे सहीष्णा सोमवंशी हीने सांगितले. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी या कोर्ससाठी अनुदान द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात विद्यार्थी युवक युवतीमधील आत्मविश्वास वाढेल आणि चांगली भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल अशी आशा सहीष्णाने व्यक्त केली आहे. तिच्या यशाने कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT