Pachora Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Pachora Heavy Rain : पाचोरा तालुक्यात ढगफुटी; पुराच्या पाण्यात शेकडो पशुधन गेले वाहून, ग्रामस्थांनी रात्र काढली जागून

Jalgaon News : मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे

संजय महाजन

जळगाव : राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असून पाचोरा तालुक्यात देखील रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने दगडी नदीला पुन्हा पूर आल्याने सातगाव डोंगरीकडून मराठवाड्यात येणाऱ्या रस्त्याचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेले असून नागरिकांनी देखील भीतीपोटी रात्र जागून काढली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी या परिसरातील वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परिणामी या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच भागातील दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. 

पुराच्या पाणी शिरल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तसेच सातगाव डोंगरीकडून मराठवाड्यात येणाऱ्या रस्त्याचा संपर्कही तुटला आहे. पुराचा वेढा पडल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका वाणेगाव शिंदाड व निंभोरी या गावांना बसण्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून 

अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरात काही वेळातच पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात परिसरातील शेकडो जनावर पशुधन वाहून गेले आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. दरम्यान गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

PM Kisan Yojana: आजच हे काम करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००; वाचा नवी अपडेट

Venus And Sun Yuti: जानेवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना होणार धनलाभ

Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

Tilachi Vadi Recipe : मकर संक्रांतीला खास बनवा तिळाच्या वड्या, वाचा इंस्टंट रेसिपी

SCROLL FOR NEXT