Raksha Khadse Amol Javale Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Political News : रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानंतर नाराजीनाट्य; भाजप जिल्ह्याध्यक्ष जावळे समर्थकांनी दिले राजीनामे

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हे देखील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.

संजय महाजन

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांच्या समवेत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव (Jalgaon) व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र अमोल जावळे यांना उमेदवारी न मिळता खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्याने (Raver) रावेर, यावल तालुक्यात जावळे समर्थक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हे देखील (BJP) भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर मतदार संघात भाजपचे काम अमोल जावळे यांनी  भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. यानंतर या पंचवार्षिक निवडणुकीत लोकसभेसाठी अमोल जावळे यांचे देखील नाव चर्चेत होते. (Jalgaon Political News) दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी ताडी जाहीर केली. यात जावळेंचे नाव नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या दुसऱ्या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे जावळे समर्थक व काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिल्ह्यात चर्चेचा विषयी झाला आहे. दरम्यान या नाराजी नाट्य संदर्भात रक्षा खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अमोल जावळे यांच्याशी बोलणे झाले असून नाराजी दूर होईल; असा विश्वास दिल्याचे सांगितले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT