व्ही-स्कुल प्रकल्प  
महाराष्ट्र

ऑनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प

ऑनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काळाची पावले ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुरु केलेला ऑनलाईन व्ही-स्कुल (V-School Learning, Teaching System) प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्वार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. (jalgaon-news-online-education-v-school-project-jalgaon-zilha-parishad-education-department)

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन व्ही-स्कुल प्रकल्पाचे उद्घाटन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, बी. एस. अकलाडे आदि उपस्थित होते. प्रकल्पाची माहिती शिक्षणाधिकारी श्री. अकलाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, चांगले उपक्रम राबविण्यासाठी जळगाव जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा व्ही-स्कुल हा उपक्रम याचेच उदाहरण आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती गरजेची झाली आहे. याचबरोबर भविष्यात ऑनलाईन शिक्षणाला महत्व प्राप्त होणार असल्याने या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार आहे. व्ही-स्कुल प्रकल्प स्थानिक बोली भाषेत उपलब्ध करुन देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

ऑनलाइन शिक्षण काळाची गरज

ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. अशावेळी विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे पूर्ण होण्यास मदत झाली आहे. लवकरच शाळा ऑफलाईन सुरु होणार असल्या तरी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

Mumbai : नालेसफाई दरम्यान भीषण दुर्घटना! विषारी वायूमुळे एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

Bharadi devi jatra: जत्रेक येऊकच व्हया! कधी आहे यंदाच्या वर्षी आंगणेवाडीची जत्रा?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

SCROLL FOR NEXT