Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : घरातून हाकेच्या अंतरावर गेले अन् झाला घात, रस्ता ओलांडताना भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Jalgaon News : यावल येथील मूळ रहिवाशी असलेले अजबसिंग पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते

Rajesh Sonwane

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर ठिय्या मांडत वाहतूक रोखली. 

जळगाव (Jalgaon) शहरातील द्वारकानगर परिसरातील रहिवासी अजबसिंग नारायण पाटील (वय ७८) असे अपघातात मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. यावल येथील मूळ रहिवाशी असलेले अजबसिंग पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. दरम्यान अजबसिंग हे नेहमीप्रमाणे ३१ औगस्टला सकाळी अकराच्या सुमारास द्वारकानगर स्टॉपजवळ समवयस्क ज्येष्ठ नागरिकांसह गप्पा मारण्यासाठी गेले होते. यावेळी ते काही कामानिमित्ताने महामार्गाच्या पलीकडे जाऊ लागले. (Accident) रस्ता ओलांडत असताना, जळगावकडून एरंडोलकडे सुसाट जाणाऱ्या कारने त्यांना जबर धडक दिली. 

कारने जोरदार धडक दिल्याने अजबसिंग हे फेकले गेले. यात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातांनतर रहिवाशांनी धाव घेत त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. साधारण तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT