Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन; मैत्रिणी गावी गेल्याने एकटीच असताना टोकाचा निर्णय

Jalgaon News : जळगाव येथे शिक्षण घेत असल्याने करुणा हि शहरातील दीक्षितवाडी परिसरात मैत्रिणींसह खोली घेऊन वास्तव्यास होती.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांर्गत येत असलेल्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण (Jalgaon) घेणाऱ्या विद्यार्थिनींने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना ७ एप्रिलला सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ (POlice) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. (Maharashtra News)

जळगावच्या यावल तालुक्यातील वाडोदा येथील करूणा संतोष बोदडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. जळगाव येथे शिक्षण घेत असल्याने करुणा हि शहरातील दीक्षितवाडी परिसरात (Jalgaon Medical Collage) मैत्रिणींसह खोली घेऊन वास्तव्यास होती. याच रूममध्ये तिने गळफास घेत आत्महत्या केली. मात्र (Student) विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मैत्रिणी गावाला गेल्याने करूणा ही रूमवर एकटीच होती. यात तिने सायंकाळी छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची एक मैत्रिण सायंकाळी पाचला खोलीवर आली. यावेळी खोलीचे दार आतून बंद असल्याने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद मिळत नाही, म्हणून मागच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता, करूणा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. याबाबत घरमालकांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. मात्र करुणाने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकलेले नसून पोलिस याचा तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलीस आयुक्तांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT