Jalgaon NCP News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पारोळ्यात सरकार विरोधात निषेध रॅली; राष्‍ट्रवादीकडून गद्दार दिन साजरा करत प्रचंड घोषणाबाजी

पारोळ्यात सरकार विरोधात निषेध रॅली; गद्दार दिन साजरा करत प्रचंड घोषणाबाजी

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : अलोकशाही पद्धतीने व स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यातील शिंदे सरकारने भाजपशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. या सरकारला २० जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या एक वर्षात कोणतेही (Jalgaon News) ठोस निर्णय न घेता राज्यातील (NCP) सरकारने जनहिताचा विचार न करता स्वहिताचा विचार केला. अशा या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करून पारोळ्यात (Parola) राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन म्हणून साजरा करत महामार्गावर घोषणाबाजी करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. (Tajya Batmya)

पारोळा येथे झालेल्‍या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते शिवतीर्थपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध करत ५० खोके मिंधे सरकार एकदम ओके, या सरकारचे करायचे काय? अशा घोषणा देत महामार्ग दणाणून निघाला होता.

अलोकशाही पद्धतीने स्थापन झालेल्या राज्य सरकारच्या जाहीर निषेध करत कोणतेही धोरण सरकारकडे नसून हेव्‍यादाव्‍याचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, प्रोत्साहनपर लाभापासून अनेक शेतकरी वंचित असे असतांना देखील याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. अशा सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून निषेध करत असून 20 जून हा गद्दार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला. शेवटी शिवतीर्थाजवळ निषेध रॅलीची सांगता करण्यात आली. या गद्दार रॅलीत जि. प. सदस्य रोहन पाटील, बाजार समिती संचालक रोहन मोरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, व्यापार व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील, तालुका अध्यक्ष संतोष महाजन, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील आदी पदाधिकारी उपस्‍थीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPF Transfer Rules: नोकरी बदलल्यानंतर PF होणार ऑटोमॅटिक ट्रान्सफर; सिंपल प्रोसेस वाचा

Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Bihar Election Result: सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने, बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कुणाला किती जागांवर आघाडी?

Bihar Election Result Live Updates: भाजप सर्वात मोठा पक्ष, कोण किती जागांवर आघाडीवर?

SCROLL FOR NEXT