Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News
Jalgaon News, Jalgaon Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News  Saam tv
महाराष्ट्र

खडसेंना उमेदवारी; जळगाव, मुक्‍ताईनगरात समर्थकांचा जल्‍लोष

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर त्‍यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सहा वर्षानंतर पदापासून दूर असलेल्‍या खडसेंना (Eknath Khadse) पुन्‍हा उमेदवारी मिळल्‍यानंतर खडसे समर्थकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहिला. यामुळे समर्थकांनी फटाके फोडून जल्‍लोष केला. (jalgaon news ncp declaired mlc candidature eknath Khadse)

खडसेंवरील आरोपांमुळे २०१६ मध्ये त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर २०१९ मध्ये भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पारभव झाला. त्यानंतर इडी कडून त्यांना सातत्याने विविध चौकशीसाठी नोटीस येत राहिल्या. यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत खडसेंनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्‍ट्रवादीत प्रवेश केल्‍यानंतर खडसेंना काय पद मिळते? याकडे लक्ष होते. कार्यकत्‍र्यांची ही प्रतिक्षा संपली असून राष्‍ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे. (Jalgaon Latest Marathi News)

जळगाव, मुक्ताईनगरमध्ये फटाके फोडून जल्लोष

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर (Jalgaon) जळगाव व मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यातत आला. यावेळी नाथाभाऊ समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT