st 
महाराष्ट्र

‘एसटी’ची भाऊबीज बुडाली

दीड कोटीची भाऊबीज बुडाली!

Rajesh Sonwane

जळगाव : संकटात असलेली लालपरी आणखीनच खड्ड्यात जात आहे. ऐन गर्दीच्‍या हंगामात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्‍यामुळे महामंडळाला मिळणारी ‘भाऊबीज’ यंदा मिळू शकली नाही. मध्‍यरात्रीपासून बसचे ‘स्टेअरिंग लॉक’ होउन चाके थांबल्‍याने जळगाव विभागातील कोणत्‍याच आगारांतून एकदेखील बस बाहेर गेलेली नाही. (jalgaon-news-msrtc-jalgaon-devison-loss-one-and-half-crore-st-employee-strke)

तुटपुंज्या पगारावर परिवाराचा उदरनिर्वाह भागत नाही. महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करावे, शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी आज मध्‍यरात्रीपासून बेमुदत आंदोलन सुरू केल्‍याने जळगाव विभागातून कोणतीच बस फेरी सुटली नाही.

दीड कोटींचे उत्‍पन्‍न बुडाले

आठवडाभरापूर्वी कर्मचारी आंदोलनामुळे फेऱ्या विस्‍कळीत झालेल्‍या आहेत. यात आजपासून कर्मचाऱ्यांच्‍या बेमुदत संपामुळे या फेऱ्या देखील बंद झाल्‍या. यात जळगाव विभागातून दिवसभरात ग्रामीण व लांबपल्‍ल्‍याच्‍या साडेचार हजार फेऱ्या होत असतात. परंतु, गर्दीचा हंगाम असल्‍याने विभागाकडून जादा फेऱ्यांचे नियोजन होते. या जादा फेऱ्या मिळून विभागातून साडेपाच हजार फेऱ्या रद्द झाल्‍या आहेत. या फेऱ्यांमधून मिळणारे दीड कोटी रूपयांपर्यंतचे उत्‍पन्‍‍न देखील बुडाले आहे.

खासगी सहारा महागात

राज्य परिवहन विभागाच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पंधरा आगर बंद असल्याने एसटी रस्त्यावरून धावताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याने प्रवासासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाचा सहारा घ्यावा लागत आहे. परंतु खासगीतील हा प्रवास प्रवाशांना महागात पडत आहेत.

बसस्‍थानकात शुकशुकाट

दिवाळीनंतर भाऊबीजची गर्दी होत असते. भाऊबीजला माहेरी गेलेल्‍या सासुरवाशीनींचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यामुळे किमान आठवडाभर तरी बसला गर्दी असते. परंतु, गर्दीच्‍या हंगामात बसस्‍थानकात पाय ठेवायला देखील जागा नसते. परंतु, जळगाव मध्‍यवर्ती बसस्‍थानक देखील सुनेसुने झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

SCROLL FOR NEXT