Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: हृदयद्रावक..जन्‍मताच आई गेली; जाऊळ काढणीचा कार्यक्रम सुरू असताना पित्‍यानेही सोडली साथ

हृदयद्रावक..जन्‍मताच आई गेली; जाऊळ काढणीचा कार्यक्रम सुरू असताना पित्‍यानेही सोडली साथ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नवजात बाळाला सोडून आई निघून गेली, त्याच बाळाचे आज जाऊळ काढणीचा कार्यक्रम होता. तेथून पिता विकास याने (Jalgaon News) मला थोडे काम आहे; जाऊन येतो असे कुटुंबीयांना सांगत गेले. यानंतर घरी येत गळफास घेवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. (Live Marathi News)

नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विकास गवळी हा परिवारासह जळगावात वास्तव्याला होता. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्‍यान मंगळवारी (ता. ३१) त्यांच्या मुलाच्या जाऊळाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात विकास गवळीने घरच्यांना मला थोडं काम असल्याचे सांगून थेट समता नगरातील राहत्या घरी परतला. त्याने राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरी परतल्‍यानंतर आई– वडीलांना धक्‍का

आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी तीनला विकासचे आई– वडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चिमुरड्याचे छत्रच हरपले

नवजात बाळ सोडून बाळंतीण आई आरती गवळी यांचा २२ डिसेंबरला मृत्यू झाला. तर, पिता विकास गवळी याला पत्नीचा विरह आणि आई विना मुलाची अवस्था पाहवत नसल्याच्या क्लेशदायक वेदनेतून विकासने पत्नी आरतीचा फोटो बघता-बघताच गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT