Akola News
Akola NewsSaam tv

Akola News: टीव्ही पहाण्याचा बहाणा करत वृद्धाचा संतापजनक प्रकार; न्यायालयाने ठोठावली शिक्षा

टीव्ही पहाण्याचा बहाणा करत वृद्धाचा संतापजनक प्रकार; न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Published on

अकोला : टीव्ही पाहण्याचा बहाणा करीत एका ६७ वर्षीय वृद्धाने घरात कोणी नसल्याचे पाहून ९ वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे केले. याप्रकरणी (Akola News) अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने वृद्धास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. (Letest Marathi News)

Akola News
Nashik News: पुरोगामी महाराष्ट्र हादरला; पतीच्या दशक्रियेला गेल्यानं विधवा पत्नीचं तोंड काळं केलं, गावात काढली धिंड

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी समाधान अर्जुन डोंगरे (वय ६७, रा. बाभुळगाव जहागीर, ता. जि. अकोला) हा ३ जुलै २०२० रोजी टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात शिरला. त्याने घरात कोणी नसल्याचे (Crime News) पाहून मुलीसोबत लैंगिक चाळे केले. त्यामुळे मुलगी घाबरून बाहेर आली व रडत होती.

आईने लागलीच केली तक्रार

आई घरी परत आल्यावर आरोपी तिथून निघून गेला. मुलीने ही बाब आईस सांगितली. यानंतर आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासले. साक्ष, पुरावा ग्राह्य मान्य करून न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com