death saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक..बाळाचा चेहरा बघण्याआधीच आईचा मृत्यू

हृदयद्रावक..बाळाचा चेहरा बघण्याआधीच आईचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील विवाहितेचा नैसर्गिक प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने अपेक्स या खासगी रुग्णालयात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. मुलगा जन्माला आला. मात्र, त्याचा चेहरा पाहण्याआधी काही तासांतच त्याच्या आईचा (Mother) मृत्यू झाला. पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. (jalgaon news mother dies dilivery before seeing the baby's face)

जळगावातील (Jalgaon) गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील (Jalgaon News) डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. याठिकाणी नैसर्गिक (नॉर्मल) प्रसूतीने बाळाचा जन्म झाला. मात्र त्यानंतर सायंकाळी पूजाची प्रकृती खालावत असल्याने तिला अतिदक्षता विभागात (अपेक्स) दाखल करावे लागेल असे डॉक्टरांकडून (Doctor) पूजाचे पती जयप्रकाश तसेच कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. तत्काळ तिला अपेक्स हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

पहाटे दोनला प्रकृती खालावत असल्‍याचे सांगितले

रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकराच्या सुमारास शस्त्रक्रिया झाली. पूजाची प्रकृती ५० टक्के चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ४८ तासांपर्यंत तिला अतिदक्षता विभागात ठेवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पहाटे दोनच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती जयप्रकाश पाहण्यासाठी गेले असता, पूजाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पूजाची ही दुसरी प्रसूती आहे, यापूर्वी एक मुलगा आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र त्याचा चेहरा पाहण्याआधीच पूजाचा मृत्यू झाल्याने चिमुकल्याचे मातृछत्र हरपले आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू

नॉर्मल प्रसूती झाली. जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम होती. नार्मल प्रसूती असतानाही अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता, असा आरोप जयप्रकाश यांनी केला आहे. मात्र डॉक्टरांनी उशिरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून, कारवाई करावी, अशी मागणी आहे.

अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे मृत्यू

प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावणे गरजचे असते. मात्र पूजा हिची गर्भपिशवी पाहिजे त्या प्रमाणात आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव सुरु झाला व तो वाढत गेला. अतिरक्तस्त्रावामुळे पूजाचा मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आमच्या डॉक्टरांच्या टीमने केले. मात्र यश आले नाही, असे डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Maharashtra Rain Live News: कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT