Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Dharangaon : आश्रम शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण; धरणगाव तालुक्यात खळबळ, आरोग्य यंत्रणा नजर ठेवून

Jalgaon News : आरोग्य विभागानेही युद्धपातळीवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक मुलांच्या निवासी आश्रम शाळेत गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शाळेतील एकूण पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

धरणगाव डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक आश्रम शाळेतील हा प्रकार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक त्रास जाणवल्याने त्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी गोवरची लक्षणे आढळून आले. यानंतर तातडीने सर्व संशयित रुग्ण विद्यार्थ्यांना आयसोलेट करून उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. 

आरोग्य विभाग अलर्ट 

घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयात हजर राहून डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे सूचित केले. आरोग्य विभागानेही युद्धपातळीवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. 

काही दिवसांपूर्वीच दिलीय गोवरची लस 

दरम्यान, विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वीच गोवरची लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात. हा तसाच प्रकार असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण यांनी दिली आहे. तर संशयित विद्यार्थ्यांना आयसोलेट करून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT