Jalgaon Accident News
Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

भीषण अपघात..तीन तरूणांचा जागीच मृत्‍यू, सहा जखमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्य प्रदेशाच्या हद्दीत असलेल्‍या जामठी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघात (Accident) झाला. यात तीन तरुण ठार तर ६ जखमी झाले आहेत. जखमी आणि मयत तरुणांना चोपडा (Chopda) शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. (Jalgaon News Accident Three Death)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वैजापूर (ता.चोपडा) गावातील तरूण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आंबा अवतार येथे आयोजित कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गाडीने निघाले होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील हद्दीत प्रवेश केल्यानंतर वळण रस्‍त्‍यावर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने तीन ते चार पलटी मारल्या. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गाडीतील तीन तरूणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर, चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावात उपचारासाठी दाखल

गाडी तीन वेळेस पलटी झाल्यामुळे निलेश शांतीवाल बारेला, जगदिश बारेला यांचा जागीच मृत्‍यू झाला. एकाचा जळगाव येथे उपचारासाठी घेवून जात असतांना रस्त्यातच मृत्‍यू झाला. या अपघात एकूण तीन जण मयत झाले आहेत. तर दोन जबर जखमी आहेत. त्यातील राहुल संजय बारेला याला जळगाव येथील न्युकलेस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तर विवेक बारेला याला गोदावरी टॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले आहे. तसेच परशुराम नाश्या बारेला, दिलिप बारेला राहूल सरदार बारेला या तिघांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT