तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, असं म्हणत आई वडिलांसमोर अल्पवयीन मुलीचे अपहरण

रामनगर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या
Wardha News
Wardha NewsSaam Tv

चेतन व्यास

वर्धा - तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, असे म्हणत चक्क आई अन् वडिलांसमोरच युवकाने अल्पवयीन मुलीस तिच्याच घरातून पळवून नेत पोबारा केला. मात्र, रामनगर पोलिसांच्या टिमने आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली. ही कारवाई रामनगर पोलिसांकडून करण्यात आली आहे. रामनगर पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका परिसरात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह घरी हजर असताना आरोपी अंकुश जाखर याने अनाधिकृतपणे मुलीच्या घरात प्रवेश केला.

हे देखील पाहा -

मुलीच्या आई वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमनाता थेट मुलीच्या आई वडिलांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तुम्ही मला तुमची मुलगी देत नाही, असे म्हणत त्यांच्या समोरच मुलीचा हात पकडून बळजबरीने मुलीला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. मुलीच्या आई वडिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अंकुशने धक्काबुक्की केली.

Wardha News
RBI ने या ८ बँकांवर केली कारवाई, तुमचे खाते आहे का या बँकेत?

अखेर मुलीच्या वडिलांनी याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात दिली. या घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच तत्काळ आरोपी अंकुश जाखर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस पथक रवाना केले. पोलिसांनी आरोपी अंकुश जाखर याला बेड्या ठोकून कोठडीत पाठविले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा पुढील तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com