RBI ने या ८ बँकांवर केली कारवाई, तुमचे खाते आहे का या बँकेत?

बँकिंग नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने ८ सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. याआधीही आरबीआयकडून अनेक बँकांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे पालन न केल्याबद्दल ८ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. विशाखापट्टणम को-ऑपरेटिव्ह बँकेला सर्वाधिक ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने ८ बँकांना दंड ठोठावला असल्याचे निवेदन जारी केले आहे. आरबीआयच्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करत नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

RBI
Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीतून मोठा दिलासा! जाणून घ्या आजचे दर

या बँकांना १०-१० लाखांचा दंड

रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँक कैलाशपुरम, तिरुचिरापल्ली, तामिळनाडूवर १० लाख रुपये, केरळमधील ओट्टापलम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडवर ५ लाख रुपये आणि ५ लाख रुपये. दारुस्सलम को-ऑपरेटिव्ह, हैदराबादवर अर्बन बँकेला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI
Snake Video : महिला गाढ झोपेत, अंगावर फणा काढून बसला कोब्रा; पुढे काय झालं?, पाहा VIDEO

रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे. नेल्लोर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. गांधीनगर, काकीनाडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लि. काकीनाडा या दोघांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, केंद्रपारा यांना १ लाख रुपये, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., प्रतापगड, उत्तर प्रदेशला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असं या निवेदनात म्हटले आहे.

का ठोठावला दंड

शाखापट्टणम को-ऑपरेटिव्ह बँक, विशाखापट्टणमवर हा दंड गृहनिर्माण योजनांसाठी उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद आणि वित्त संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात बँकांच्या निष्काळजीपणामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com