Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: मधुकर सहकारी साखर कारखान्‍याची होणार विक्री; जिल्हा बँक संचालक बैठकीत निर्णय

मधुकर सहकारी साखर कारखान्‍याची होणार विक्री; जिल्हा बँक संचालक बैठकीत निर्णय

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यातील न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. त्याची ६३ कोटी रुपयाला विक्री करण्यात आली आहे. या विक्री प्रक्रियेवर आज (JDCC Bank) जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बँकेचा तोटा कमी होऊन नफ्याकडे वाटचाल करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सांगितले. (Marathi Letest News)

जिल्हा बँकेच्या (Jalgaon) संचालक मंडळाची बैठक १० ऑक्‍टोंबरला बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी उपाध्यक्ष श्‍यामकांत सोनवणे, संचालक एकनाथराव खडसे (Eknath Khadse), आमदार अनिल पाटील, डॉ. सतीश पाटील, प्रदीप देशमुख, संजय पवार, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

विक्री प्रक्रीयेच्‍या निविदा मागविल्‍या

गुलाबराव देवकर यांनी सांगितले, की मधुकर सहकारी (Sugar Factory) साखर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. त्याच्या वसुलीसाठी ऑनलाइन विक्री प्रक्रियेच्या निविदा मागविण्यात आल्या. यात इंडिया बायो ॲग्रो लिमिटेडची निविदा मंजूर करण्यात आली व ६३ कोटी रुपयांना कारखान्याची विक्री करण्यात आली. त्या विक्री प्रक्रियेला संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

पूर्ण रक्कम भरल्यावर ताबा

कंपनीने निविदा भरताना दहा टक्के रक्कम भरली आहे. सात दिवसांत १५ टक्के रक्कम भरणार आहे. नियमानुसार त्यांनी पूर्ण ७५ टक्के रक्कम एका महिन्यात भरावयाची आहे. मात्र, त्यांनी तीन महिन्यांचा कालावधीचे मागणी करणारे पत्र दिले आहे. तीन महिन्यांपैकी एक महिन्यानंतर पुढील दोन महिने जी रक्कम भरणार आहे. त्यावर अकरा टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. तीन महिन्यांत पूर्ण रक्कम भरल्यावर त्यांना ताबा देण्यात येईल. मात्र १५ टक्के रक्कम भरल्यावर त्यांना कारखाना साफसफाई करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार देण्यात येईल. कारखाना या हंगामात सुरू करण्यात येणार आहे.

साखर विक्रीस परवानगी

कारखान्याची वीस कोटी रुपयाची साखर न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आली आहे. कारखाना विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची देणी कंपनीने करावयाची आहेत. कंपनीने पूर्ण रक्कम भरल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेली साखर विक्रीबाबत ना हरकत पत्र जिल्हा बँक देईल. त्यामुळे ही साखर विक्री करण्याचा अधिकारी कंपनीस असेल व कंपनी त्या विक्रीतून शेतकऱ्यांची उसाची देणी व कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम व इतर देणी अदा करेल. यात शेतकऱ्यांचे सोळा कोटी व कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडाची साडेतीन कोटी रुपयांची रक्कम देणी आहेत.

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी बँकेच्या ताब्यात आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश उठल्यानंतर त्याच्या विक्रीची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल.

-गुलाबराव देवकर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा बँक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT