Jalgaon News Lumpy Disease Saam tv
महाराष्ट्र

‘लम्पी’चा उद्रेक; जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी

‘लम्पी’चा उद्रेक; जळगाव जिल्‍ह्यात १२२ जनावरे मृत्यूमुखी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जनावरांमध्ये लम्पी स्किन डीसीज आढळला आहे. त्यामुळे एक हजार ८०० पशूधन बाधित झाले असून, आतापर्यंत १२२ जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. लम्पी स्किन (Lumpy Disease) आजारामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात झाले आहेत. पशूसंवर्धन विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत दोन लाख २५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. (Jalgaon News Lumpy Disease)

लम्पी आजाराचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे (डास, माश्‍या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर, तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींतर्फे पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करण्यात येत आहे. विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद काही काळासाठी बंद ठेवले आहेत.

अशी आहे आकडेवारी

– लम्पी आजाराने बाधित गुरे : ५,१८०

– एकूण मृत गुरे : १२२

– जिल्ह्यातील गुरे : ५ लाख ५० हजार

– आतापर्यंत लसीकरण झालेली गुरे : २ लाख २५ हजार

– प्रत्येक तालुक्यात कार्यरत टीम: ६

आतापर्यंत जिल्ह्यात लम्पी आजाराने १२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २ लाख २५ हजार गुरांना लसीकरण झाले आहे. साडेपाच लाख गुरांना लसीकरणाचे उद्दिष्ठ आहे. ते लवकरच पूर्ण होईल. पशुपालकांनी गुरांना लम्पीची लागण झाल्याचे लक्षात येताच पशूसंवर्धपन विभागाला कळवून गुरांवर उपचार करून घ्यावेत.

-डॉ. श्‍यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंर्वधन विभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT