Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: थरारक..बिबट्याच्‍या जबड्यातून सुटला; सरपण गोळा करायला गेला असता हल्‍ला

थरारक..बिबट्याच्‍या जबड्यातून सुटला; सरपण गोळा करायला गेला असता हल्‍ला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात भावासोबत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) चढविला. मात्र, तरुणाने प्रसंगावधान राखल्याने त्याचे प्राण वाचले. दबा धरून बसलेल्या बिबट्या मान जबड्यात घेणार इतक्यात पूर्ण ताकदीने तरुणाने बिबट्याला अंगावरूनच (Jalgaon News) बाजूला फेकल्याने अनर्थ टळला. आरडाओरड झाल्यामुळे बिबट्याने जंगलात पळ काढला. (Live Marathi News)

मन्यारखेडा (ता.जळगाव) येथील मदन सुखदेव अहिरे (वय २५) मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (२८) याच्यासोबत गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील रानात सरपण गोळा करण्यासाठी रविवारी (ता. ३०) गेला. दोन्ही भाऊ सरपण गोळा करीत असताना, राजेंद्र थोडा पुढे होता, तर मदन मागे राहून लाकडे गोळा करीत होता. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र, मदनला नेमके काय झाले, हे कळाले नाही. मात्र, मानेवर दोघे पंजे आणि जबड्यात बिबट्या मान धरणार नेमक्या त्याच क्षणाला मदनने बिबट्याचे दोन्ही पंजे मानेपासून वेगळे करून त्याला पटकले.

भावाची धाव

रक्तबंबाळ झाल्यावर मदनच्या मदतीला भाऊ धावून आला, म्हणून बिबट्या जंगलात पळून गेला. भाऊ राजेंद्रने जखमी मदनला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मदनच्या कुटुंबियांनी रुग्णालयात गर्दी केली होती. बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

Chai Masala Powder : चहाचा स्पेशल मसाला घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT