suicide 
महाराष्ट्र

प्रेमभंगातून तरूणाची आत्महत्या; भिंतीवर लिहून ठेवले कारण

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : किनगाव बु. (ता.यावल) येथे प्रेमभंग झाल्याने एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (२२ डिसेंबरला) सायंकाळी उघडकीस आली आहे. यामुळे किनगाव परिसरात खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-kingaon-village-young-man-suicide-due-to-love-affair-Because-written-on-the-wall)

किनगाव बु. (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राजू महाजन कुटुंबासह राहतात. बुधवारी ते त्यांची पत्नी, लहान मुलगा व लहान मुलाची पत्नी त्यांचेसह सर्व शेतात कामाला गेले होते. तर त्यांचा अविवाहित मोठा मुलगा समाधान महाजन (वय २७) हा घरी एकटा होता. महाजन कुटुंबीय सायंकाळी साडेपाचला शेतातून घरी परतले असता त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान महाजन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना घरात आढळून आला. सदर प्रकार पाहून महाजन कुटुंबीय प्रचंड हादरले.

आत्‍महत्‍येपुर्वी लिहिले भिंतीवर

याबाबतची माहिती पोलिसांना (Police) दिली असता घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार पथकासह दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. समाधान याने आत्महत्येपूर्वी भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या (Suicide) करीत असल्याचे लिहिलेले आढळून आले. समाधान महाजन याने बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण करून तो वडिलांसोबत शेतीकाम करायचा. या प्रकरणी यावल पोलिसात मयत समाधान महाजन यांचा भाऊ योगेश महाजन यांनी दिलेल्या खबरवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार अजित शेख हवालदार नरेंद्र घुले करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात आई- वडील, लहान भाऊ, वाहिनी असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT