Rohit Pawar News Saamtv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: 'मुख्यमंत्री साहेब सत्तेची नशा अशी असते का?' पत्रकाराला भरचौकात बेदम मारहाण; आमदार रोहित पवार संतापले

Jalgaon News: पाचोरा तालुक्यातील जळगावमध्ये एका पत्रकाराला भरचौकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Prachee kulkarni

Jalgaon News: काही दिवसांपूर्वीच पाचोरा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये या पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर आता या पत्रकाराला भरचौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याच्या घटनेवरुन आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. या मारहाणीचा व्हि़डिओ ट्वीट करत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांचे ट्वीट...

"पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली, त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी आले असेल.." असे संतप्त ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

सत्तेची नशा अशीच असते का?

"आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो,सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे,परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे." असेही रोहित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT