Bus Accident: मोठा अपघात टळला; धावत्या बसचे टायर निखळले, सुदैवाने ६२ प्रवाशांचा वाचला जीव

Parbhani News मोठा अपघात टळला; धावत्या बसचे टायर निखळले, सुदैवाने ६२ प्रवाशांचा वाचला जीव
Bus Accident
Bus AccidentSaam tv

परभणी : धावत्या बसचे चाक अचानक निखळले. परंतु पिकअप चालकाच्या प्रसंगावधानामुळे टायर निखळलेल्या (St Bus) बसमधील ६२ प्रवाशांचा जीव वाचला. त्यांच्यासाठी पिकअप चालक भागवत मुंडे (रा. परळी, जि. बीड) हे देवदूत ठरले. ही घटना गंगाखेड (Gangakhed) पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी शिवारात दुपारी घडली. (Live Marathi News)

Bus Accident
Indian Army Jawan Martyred : जवान किशाेर पारवे हुतात्मा, जाफराबादवर शाेककळा

गंगाखेड आगाराची बस गंगाखेडहून पालमकडे ६३ प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली होती. ती केरवाडी शिवारात आली असता, तिचे पाठीमागील एक चाक निखळले. तेव्हा बस भरधाव वेगात होती. त्यामुळे निखळलेले चाक जवळपास १०० फूट अंतरावरील नालीत जाऊन पडले. यानंतर ही बस एका टायरवर धावू (Parbhani) लागली. तो टायरही पलीकडच्या बाजूला गेला होता. हे दृश्य समोरून येणाऱ्या पिकअप चालक भागवत मुंडे यांनी पाहिले. लागलीच त्यांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओरडून बस चालकाला हातवारे केले. 

Bus Accident
Tuljabhavani Mandir: तुळजापूरमध्ये बोगस पुजारी; भाविकांच्या फसवणूकीचे प्रकार

बस थांबली म्हणून.. 

बसचालक माणिक विठ्ठलराव टोने यांनी ते पहिले. सुरुवातीला त्यांनी डाव्या बाजूचे चाक पहिले, ते व्यवस्थित होते. त्यानंतर त्यांनी उजव्या बाजूला पहिले, तेव्हा त्यांच्या (Accident) लक्षात आले. तातडीने त्यांनी बसला ब्रेक लावला. त्यावेळी काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचे प्रवाशांना लक्षात आले. तेव्हा चालकांनी खाली उतरल्यावर सर्व प्रकार लक्षात आला टायर निघून गेल्यावर ब्रेक लावले असता मोठा अपघात झाला असता त्यामुळे हे सर्व प्रवाशांनी निश्वास सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com