Sambhajinagar Adarsh Scam : ठेवीदारांना पैसे मिळणार? 'आदर्श' च्या 'त्या' कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्ती येणार

पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये पैसे बुडाल्याच्या भीती निर्माण झाली आहे.
chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad
chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabadsaam tv

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज काढलेल्या कर्जदारांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. यामुळे ठेवीदारांच्या हाती फूल ना फूलाची पाकळी पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. (adarsh nagari sahakari patsanstha latest news)

chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad
Maharashtra Electricity Rate: अन्य राज्यांत वीजदर कमी, महाराष्ट्रातील वाढीव वीजदराची चाैकशी करा; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून गेल्या काही वर्षांमध्ये 1400 जणांनी 244 कोटींचे कर्ज उचलले. मात्र, पतसंस्थेच्या डबघाईच्या अंदाजानंतर त्यांनी हप्ते थकवले. प्रशासनाकडून आता या कर्जदारांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून कमी वेळेत अधिक वेगाने कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad
Palghar Talasari Hospital Viral Video: पालघरला मांत्रिकाकडून ग्रामीण रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार?

त्यातून पतसंस्थेला आर्थिक रक्कम प्राप्त होऊन ठेवीदारांच्या रकमा देणे अधिक सुलभ होईल, या दिशेने प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अधिकृतरीत्या पोलिसांनी 35 मालमत्ता शोधून काढल्या असल्या तरी हा मालमत्तेचा आकडा 80 च्या घरात जाईल, अशीही शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल आणि ठेवीदारांची रक्कम परत केली जाईल, असे सांगितले जाते.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com