JDCC Bank 
महाराष्ट्र

काँग्रेस बाहेर; सर्वपक्षीय विषय संपुष्टात; जिल्‍हा बँक निवडणुक

काँग्रेस बाहेर; सर्वपक्षीय विषय संपुष्टात; जिल्‍हा बँक निवडणुक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत काँग्रेस भाजपसोबत न जाण्यावर ठाम राहून सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याचा ठाम निर्णय जाहीर केला आहे. आता सर्वपक्षीय विषय संपला असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. (jalgaon-news-jdcc-bann-election-Out-of-Congress-All-party-subject-termination)

जिल्हा बँक संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलमधून काँगेसने बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर शनिवारी (ता. १६) पुन्हा सर्वपक्षीय नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. भाजपतर्फे गिरीश महाजन, शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसतर्फे आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेसध्यक्ष प्रदीप पवार, डी. जी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील उपस्थित होते.

कॉंग्रेसची ठाम भुमिका

बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याची ठाम भूमिका घेतली. मात्र, महाविकास आघाडी होत असेल, तर त्यात आम्ही सहभागी होऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनलचा विषय संपुष्टात आला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांची आघाडी होणार काय, याकडेच लक्ष लागून आहे.

नेत्यांचा काढता पाय

बैठक झाल्यानंतर नेते माहिती देण्यास उत्सुक नव्हते. मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन फारसे न बोलता निघून गेले. त्यामुळे चित्र फारसे चांगले नसल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT