महाराष्ट्र

अल्‍पवयीन प्रेमीयुगलाची आत्‍महत्‍या; तासाभराच्‍या अंतराने केले विष प्राशन

अल्‍पवयीन प्रेमीयुगलाची आत्‍महत्‍या; तासाभराच्‍या अंतराने केने विष प्राशन

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : कुंभारी येथे अल्‍पवयीन युवक व युवतीने तासाभराच्‍या अंतरात विष प्राशन करून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना उघळकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्‍महत्‍या केल्‍याचे बोलले जात असून त्‍या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. (jalgaon-news-jamner-talika-kumbhari-village-Suicide-of-a-young-couple)

कुंभार तांडा (ता. जामनेर) येथील अल्‍पवयीन युवतीने ९ नोव्‍हेंबरला घरात कोणी नसताना दुपारच्‍यावेळी विष घेत आत्‍महत्‍या केली. आई– वडील घरी आल्‍यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. १६ वर्षीय युवतीने आत्‍महत्‍या केल्‍याने सारेच सुन्‍न झाले आहेत. यानंतर अवघ्या तासाभरातच १७ वर्षीय युवकाने शेतात जावून विष प्राशन करत आत्‍महत्‍या केली. युवकाचा मृतदेह शेतातच रात्रभर पडून होता. यानंतर दुस दिवशी व्‍यक्‍तीस युवकाचा मृतदेह शेतात पडून असल्‍याचे निदर्शनास आले.

आत्‍महत्‍येपुर्वी मुलाचा काकाला संदेश

दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा गावात आहे. याबाबत पोलिस पाटील किंवा कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिलेली नव्‍हती. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात जावून तपास केला. मुलाचा मोबाईल ताब्यात घेतला असून या मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदेश पवन याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

प्रेमप्रकरणातून आत्महत्येची चर्चा

कुंभारी येथील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चौकशी केली असता दोघे अल्पवयीन असून त्यांनी प्रेमप्रकरणातून विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. चौकशीसाठी दोघांच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावले असून तपास सुरु असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT