जळगाव : शहरातील शनिपेठ परिसरातील महापालिका शाळा क्रमांक १७ जवळ असलेली जुनी दोन मजली इमारत आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कोसळली. यामध्ये सुमारे ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. (Two-storey building collapses in Jalgaon)
शनिपेठ भागांमध्ये इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. महापालिकेची १७ क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. त्याच्याच समोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे अचानक कोसळली. जोरात आवाज झाल्याने घाबरलेल्या नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. यासाठी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली.
ढिगाऱ्याखाली दबला परिवार
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे.
अन वरच्या मजल्यावरील परिवार खाली उतरला
इमारत कोसळत असतांना जसा आवाज व्हायला लागला; तसे वरच्या मजल्यावरील काही नागरिक बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. मात्र ज्या वेळेला इमारत कोसळली तेव्हा खालच्या मजल्यावर असणाऱ्या वृद्ध महिला मात्र अडकून पडल्या. त्यांना जवळच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दगड व इतर मलबा बाजूला सारीत बाहेर काढले. दोन मजली इमारतीमधील राहणाऱ्या नागरिकांचा संसार नष्ट झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.