जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपसह सर्व पक्षीय आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने वेगळा घरोबा करीत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्हा बँकेत सद्याच्या एकनाथ खडसे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. (jalgaon-news-jalgaon-jilha-bank-election-congress-will-contest-independently)
काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा बँक संचालक सुरेश पाटील, राजीव पाटील, आर. जे. पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.
कॉंग्रसला यश मिळण्याचा विश्वास
जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले, की काँग्रेसने जिल्हा बँक निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे पुरेसे उमेदवार आहेत. तसेच आजही काँग्रेस पक्षाच्या विचारांचे मतदार आहे. त्यांचा पक्षाच्या कार्यावर विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला यश मिळेल याचा विश्वास आहे.
खडसेंच्या कामावर नाराजी
माजी खासदार उल्हास पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत सद्या सर्वपक्षीय पॅनल आहे. मात्र शेतकऱ्यांची त्यांच्यावर नाराजी त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले नाहीत. जळगाव जिल्हा बँकेत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे अध्यक्ष आहेत. मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खडसे यांच्यावर टीका केली आहे.
बिनविरोध अशक्य
दुसऱ्या बाजूला आता पुन्हा भाजपसह सर्व पक्षीय पॅनल करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाने वेगळा घरोबा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पक्षीय पॅनलचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे अशक्य झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.